दिल्ली : करोना आला.. म्हाताऱ्यांना सर्वाधिक बाधा.. तरुण रुग्णांचीही वाढतेय संख्या.. महिलांपेक्षा पुरुष रुग्णांची टक्केवारी जास्त.. या आणि अशा बातम्यांचा वर्षाव मागील दीड वर्षात झालेला आहे. त्यावरील उपचार आणि औषधे यांच्याही बातम्या जोरात आल्या आणि उपचारपद्धती फेल असल्याच्याही बातम्या आल्या.. पण आता दुसऱ्या लाटेत करोना विषाणूचे संक्रमण लहान मुलांमध्ये होण्यास सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. एकूणच करोना म्हणजे आणखीनच मोठे संकट बनत आहे.
लॉकडाऊन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. अशावेळी लोक सुटकेचा श्वास घेत आहेत नाहीत तोच उत्तराखंडमधील नागरिकांनी याचा धसका घेतला आहे. येथील कोरोनाचे आकडे भयभीत करणारे असतानाच मागील दहा दिवसांत या राज्यात 9 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 1000 मुलांमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे रिपोर्ट आलेले आहे. देशाच्या इतर भागातही अनेक मुलांना करोना बाधा होऊन ते बरे होत आहेत. येथील मुलांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अजुनही त्यांच्यातून मृत्यूचे आकडे काही आलेले नाहीत. मात्र, एकूण परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. नैनितालमधील लिबरहेरी आणि काही खेड्यात गेल्या दोन आठवड्यात 30 जणांचा मृत्यू झालेले आहेत.
उत्तराखंडमध्ये दर एक लाख लोकांवर 771 रुग्ण सापडत आहेत. जे उत्तर प्रदेशातील प्रत्येक लाख लोकांपेक्षा सात पट जास्त आहेत. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे 79,379 सक्रिय रुग्ण असून 4426 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा पद्धतीने हिमालयाच्या कुशीतील हे राज्य सध्या करोना संकटाशी सामना करीत आहे. त्याचवेळी या भागात 9 वर्षांखालील रुग्णांची संख्या वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.