Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तौते चक्रीवादळाचा बसलाय किनारपट्टीच्या भागात मोठा झटका; पहा अपडेट आणि नुकसानीचे फोटोही

मुंबई : तौते चक्रीवादळाचा अरबी समुद्रालगतच्या किनारपट्टी भागाला मोठा झटका बसला आहे. यामुळे मच्छीमार आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टी भागात यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या असून खलाशी राजाराम कृष्णा कदम यांचे निधन झालेले आहे. तर, दिनानाथ जोशी, नंदकुमार नार्वेकर, प्रकाश गिरीद हेही बेपत्ता आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “भयंकर आहे की हे.. निसर्ग आहे हा.. जीवन देणारा आणि….” / Twitter

Loading...
Advertisement

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतल्याने आणि दिशा बदलल्याने मुंबईलाही मोठा झटका बसला आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे. केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. या वादळात अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्याचे काही फोटो असे :

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply