Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मोदीजींना सोडून फडणविसांनी लिहिले थेट सोनिया गांधींनाच पत्र..!

आजार म्हशीला आणि औषधोपचार पाखल्याला करण्याची भारतीय परंपरा मोठी आहे. वर्षानुवर्षे मुरलेली हीच सवय अनेकदा भाजपच्या जबाबदार नेते व पदाधिकाऱ्यांना अनेकदा वेगळेच काहीतरी करण्यासाठी प्रेरित करीत असते. तसाच प्रकार आता माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भयावह कोरोना स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडे तक्रार करण्याचे सोडून थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “महाराष्ट्रातील भयावह कोरोना स्थितीवरून विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारकडून कोरोना आकडे व आर्थिक पॅकेज या दोन्ही गोष्टींमध्ये बनवाबनवी करण्यात येत आहे. त्यांना सल्ला देण्याचं काम सोनियांनी करावं. https://t.co/BNYqYyhKJY” / Twitter

Advertisement

मुळात महाराष्ट्रात जर चुकीची माहिती आणि आकडेवारी दिली जात असेल तर फडणवीस साहेबांनी याप्रकरणी न्यायालयात जाणे किंवा केंद्र सरकारला यामध्ये चौकशी करण्यासाठी साकडे घालणे आवश्यक होते. मात्र, त्यामुळे प्रश्न निकाली निघण्याची शक्यता जास्त होती. कारण, यात केंद्राने चौकशी करायला सुरुवात केली असती तर ऐन करोना संकटात वेगळेच राजकारण जोरात आले असते. मात्र, मग त्यांनी महाराष्ट्र राज्यात थेट हस्तक्षेप करू न शकणाऱ्या सोनिया गांधी यांनाच पत्र देऊन राजकीय मुद्दा ट्रेंडमध्ये आणला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “आज्जी तर ‘सुपर दादी’च; HRCT 20 आणि ऑक्सिजन 75 वर जाऊनही केली करोनावर मात..! @krushirang https://t.co/uMva5IkbLE” / Twitter

Advertisement

सध्या महाविकास आघाडीचा एक घटकपक्ष म्हणून काँग्रेस सत्तेत आहे. मात्र, काँग्रेसकडे मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री हे दोन्ही पद नाहीत. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवणे योग्य ठरले असते. किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत केंद्राकडे किंवा स्वतंत्र चौकशीच्या मागणीसाठी न्यायालयाकडे जाणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी फडणवीस यांनी फ़क़्त मोठ्या बातमीचा विषय करण्यासाठी म्हणून सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. आता त्यावर काहीही कार्यवाही करण्याची जबाबदारी नसलेल्या सोनिया गांधी कोणता निर्णय घेतात, याकडे चक्क राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

*(ता. क. : भाजपचे राजकारण किंवा चुका दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न नाही. मात्र, योग्य ठिकाणी पत्र दिले तर कारवाई होऊ शकते, हाच मुद्दा अधोरेखित करण्यासाठी हा लेखप्रपंच. कोणालाही याबाबत वेगळी भूमिका लिहिण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपले लेखन किंवा व्हिडिओ krushirang@gmail.com यावर पाठवावे. आम्ही त्यास प्रसिद्धी देऊ : संपादक)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply