Take a fresh look at your lifestyle.

बाब्बोव.. म्हणून ‘हा’ मासा खायला द्यावा लागते सोन्यासारखाचा पैसा; पहा किती आहे या माशाची किंमत..!

पुणे : मासा खायला अनेकांना आवडतो. मात्र, त्याचे काटे हे यातील मोठे संकट असते. तरीही जगभरात मासे खवय्यांची संख्या कमी झालेली नाही. याचे कारण दडले आहे माशांच्या चवीमध्ये. प्रत्येक माशाची किंमतही वेगवेगळी असते. काहींना खूप कमी तर काहींना सोन्यासारखाही भाव असतो.. होय, बरोबर वाचले तुम्ही.. सोन्यासारखा भाव असणाऱ्या माशाच्या जातीही या पृथ्वीवर आहेत की..

Advertisement

Advertisement

जपानमधील खास उनागी फिश याबाबतची ही माहिती आहे. हा एक गोड्या पाण्यातील मासा आहे. हा मासा विशेष आहे. कारण जपानमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या या माशाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. वर्ष 2018 मध्ये तर एक किलो बेबी इलची किंमत 35 हजार डॉलर्स होती. त्यावेळी सोन्याच्या किंमतीही इतक्याच होत्या. ही बेबी इल पकडली जातात आणि त्यांचे पालनपोषण एका वर्षासाठी काळजीपूर्वक केले जाते. यानंतर त्यांची विक्री होते. जपानी लोक हजारो वर्षांपासून ईल्स खात आहेत. रेस्टॉरंट्समध्ये दरवर्षी 40 ते 50 टन इल विकल्या जातात. पूर्व आशियामध्ये जपानी ईल्स आढळतात.

Advertisement

Krushirang on Twitter: “दिलासादायक बातमी : DRDO च्या ‘2डीजी’चे पाकिटे तयार; पुढच्या आठवड्यात ‘त्यांना’ मिळणार औषध @krushirang https://t.co/TCU2C3hsC3” / Twitter

Advertisement

जास्त मासेमारी आणि नैसर्गिक अधिवासांचे नुकसान झाल्यामुळे उनागी फिश यांची संख्या घटली आहे. 1980 पासून त्यामध्ये 75% इतकी मोठी घट झाली. इतर मासे मोठे झाल्यावर पकडले जातात. परंतु लोकांचा धोका असलेल्या उनागी फिश या इलच्या पिल्लांना पकडले जाते. मग त्यांचे पालनपोषण केले जाते. परिणामी याची किंमत सर्वात जास्त होते. त्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा आहार दिला जातो. त्यांना फिश फीड, गहू, सोयाबीन आणि फिश ऑइल दिले जाते. त्यांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कारण एखाद्या माशास इजा झाली असेल तर त्याबरोबर राहणारे सर्व मासे खराब होतात. यास वाढीसाठी 6-12 महिने लागतात. एकदा वाढल्यानंतर ते लांबीच्या आधारे वेगळे केले जातात आणि विकले जातात.

Advertisement

रेस्टॉरंट्समध्येही या माशाला मोठी मागणी आहे. याची कबायकी नावाची डिश बनवण्याचे शिकण्यासही बरीच वर्षे लागू शकतात. त्यासाठीचाही खर्च मोठा आहे. जपानमध्ये असे म्हटले जाते की, हे कट कापण्यास शिकण्यासाठी काहींचे संपूर्ण आयुष्य जाते. ग्रीलिंगबद्दलही असेच म्हटले जाते. म्हणूनच खास तांदळाबरोबर हे इल खाल्ले जातात. त्याची किंमत 91 डॉलरपर्यंत असू शकते. जपानमध्ये उन्हाळ्यात याला खूप मागणी असते. अगदी खास फेस्टीव्हलमध्येही हा मासा खाल्ला जातो. 2014 मध्ये जपानमध्ये या माशाला संरक्षित करण्यात आल्याने जपानमधील मच्छिमारांना समस्या निर्माण झाल्या. अगदी चीन आणि तैवानमधून याची तिथे आयात करावी लागते. आता अमेरिकेतदेखील याचे संगोपन केले जाते. जास्त किंमत असल्यामुळे याची तस्करी सुरू झाली आहे. वाढती किंमत, घटणारी संख्या आणि मागणी यांची पूर्तता करणे याचे संतुलन राखणे हे मत्स्यपालनामध्ये एक मोठे आव्हान आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Krushirang on Twitter: “आज्जी तर ‘सुपर दादी’च; HRCT 20 आणि ऑक्सिजन 75 वर जाऊनही केली करोनावर मात..! @krushirang https://t.co/uMva5IkbLE” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply