Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आणि ‘त्या’ फसव्या बातम्यांनी ‘हमास’चा झाला घात; पहा नेमके काय घडले इस्राइलमध्ये प्रकरण

जेरुसलेम : सध्या मिडल-इस्टमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झालेला आहे. त्यामध्ये ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या माध्यमांच्या वापरातून इस्राइलने हमास नावाच्या संघटनेवर मोठा हल्ला करून यश मिळवले आहे. आता या एकूण माध्यमांच्या फसव्या बातम्यांचे प्रकरण जगजाहीर झालेले आहे.

Advertisement

हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी इस्त्राईलने माध्यमांचा वापर केल्याने किमान डझनभर दहशतवादी मारले गेल्याचे म्हटले जात आहे. पॅलेस्टाईनबरोबर रक्तरंजित युद्धात इस्रायलने आतापर्यंत अनेक हल्ले केले आहेत. इस्राईलच्या पत्रकारांनी याबाबत सांगितले आहे की, इस्राईलच्या सैन्याने हमासच्या भोवती जाळे विणण्यासाठी मीडियाचा वापर केला आहे. इस्रायली सैन्याने माध्यमांना निवेदन जारी केले की, इस्त्रायली हवाई दल आणि सैन्याने गाझा पट्टीवर हल्ला केला आहे. या संक्षिप्त निवेदनामुळे इस्त्रायलने गाझावर जमीनी हल्ले केल्याचा अंदाज वर्तवण्याच्या बातम्या जोरात सुरू झाल्या. काही पत्रकारांनी तर त्याच्याही पुढे जाऊन ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी हल्ला सुरू झाल्याचे सांगण्यास सुरुवात केली. नंतर काही तासांनंतर इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये इस्त्रायली सैन्य नसल्याचे स्पष्टीकरण जारी केले. परंतु तोपर्यंत इस्त्रायली सैन्याने आपला कार्यभाग उरकून घेतला होता.

Advertisement

बातम्या पाहून बोगद्याच्या भूमिगत नेटवर्कमध्ये जाताना हमास सैनिकांनी बचावात्मक पवित्रा घेतला. इस्रायलने हीच संधी साधून 160 युद्ध विमाने थेट या भागात पाठवली. सुमारे 40 मिनिटांसाठी या बोगद्यावर बॉंबफेक करण्यात आली. इस्त्राईल चॅनेल 13 टीव्ही पत्रकार हेलर यांनी म्हटले आहे की, या हल्य्यात शेकडो अतिरेकी मारले गेले असा इस्त्रायली सैन्याला विश्वास आहे. माध्यमांनी चुकीच्या समजुतीमुळे अशा बातम्या दिल्याचे इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे. मात्र, असे असले तरी इस्त्रायली पत्रकारांनी सांगितले की, मीडियाचा वापर हमासच्या अतिरेक्यांना प्राणघातक सापळ्यात अडकवण्यासाठी केला गेला. सैन्य खोटे बोलत नाही. मात्र, त्यांनी मुत्सदीपणे फसवणूक केली.

Loading...
Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply