Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आणि इस्राइलनेच उभे केले ‘हमास’; पहा नेमकी कशी उभी राहिली ही जगप्रसिद्ध संघटना

गुगल सर्चमध्ये India-Palestine relations असे सर्च करून पाहिले की अनेक फोटो आणि लिंक समोर येतात. त्यामध्ये या दोन्ही देशांमध्ये मित्रत्वाचे संबंध असल्याचे पदोपदी दिसते. त्याचवेळी पॅलेस्टाईनमधील हमास (hamas) नावाच्या संघटनेबद्दल सर्च केल्यावरही खूप काही ज्ञान मिळू शकते. कारण, सध्या इस्राइल-हमास संघर्ष पुन्हा एकदा विकोपाला गेलेला आहे. अशावेळी हमास नावाची संघटना आणि त्यांचे कार्य याबाबतचा ट्रेंड चालू आहे.

Advertisement

इस्राइल हा एक देश आहे, हे सगळ्यांना माहित आहे. तंत्रज्ञान आणि शेतीमधील क्रांतीबाबत अनेकांना या देशाचा हेवा वाटतो. त्यामुळे अनेकांना तो आदर्शही वाटू शकतो. तसेच आपण जर हिंदुत्ववादी असाल तर आपल्याला हा देश खूपच जवळचा वाटू शकतो, अशीच परिस्थिती आहे. कारण, मग आपण त्याला मुस्लीम-ज्यू असा संघर्ष म्हणून पाहू शकतो. मात्र, तो जमिनीचा संघर्ष आहे. मात्र, म्हणतात ना दिसते तसे नसते. असाच प्रकार जागतिक राजकारणात असतो. अरबस्तानातील जमिनीवर ज्यू धर्मियांनी कब्जा करून 1940 च्या दशकात इस्राइल हा देश आकारास आलेला आहे. तत्कालीन अमेरिकन नेतृत्वाच्या मदतीने हा देश अरबांच्या नाकावर टिच्चून फुलला आहे.

Advertisement

तर, याच इस्राइल नावाच्या छोटेखानी देशाला कडाडून विरोध करणारी पॅलेस्टाईनमधील लोकांची संघटना आहे हमास. आता ही हमास म्हणजे अमेरिकेने जसे तालिबानींना रशियाच्या विरोधात मदत करताना कट्टर मंडळींना मदत करून विद्रोही सैन्य तयार केले त्यातलाच प्रकार आहे. हमास हे इस्राइलचेच अपत्य आहे. 1970 मध्ये त्याला तत्कालीन इस्राइली सरकार आणि लष्कराने पैसे आणि ताकद दिली. हेतू होता पॅलेस्टाईनमधील जमिनीवर कब्जा करताना त्या देशात दोन गट निर्माण करणे. त्यात अगोदर इस्राइलला यश आले. पण, नंतर त्यांच्यावरची ही संघटना उलटली आहे. त्याचा फटका पॅलेस्टाईनमधील सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.

Advertisement

इस्त्राईलच्या जन्मानंतरही पॅलेस्टाईनबरोबरचा त्यांचा संघर्ष सर्व स्तरांवर सुरूच होता. पॅलेस्टाईन नेते यासिर अराफात यांना भारतासह जगभरात आदराचे स्थान होते. आंतरराष्ट्रीय मंचांवर ते एक शक्तिशाली नेते होते. तर, त्यावेळी 1970 च्या दरम्यान मुत्सद्दी पातळीवर पॅलेस्टाईन कमकुवत होत असल्याचे इस्त्राईलला वाटले तेव्हा त्यांनी पॅलेस्टाईनच्या कट्टरपंथी संघटनेला उदारमतवादी पॅलेस्टाईन नेत्यांच्या विरोधात उभे केले. त्यातूनच हमास नावाची कट्टर संघटना उभी राहिली. तथापि, हमासची औपचारिक स्थापना 1987 मध्ये मानली जाते.

Advertisement

theintercept.com यांनी म्हटले आहे की, इस्रायलचे माजी जनरल यित्झाक सेजेव म्हणाले होते की, लोखंडाने लोखंड कापण्याचे हे धोरण म्हणजे ऐतिहासिक चूक होती. इस्रायली सरकारने मला हमाससाठी फंड दिला होता. आम्ही अजूनही त्याबाबत दिलगीर आहोत. सेजेव्ह यांनी 1980 च्या दशकात गाझाचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. एकूणच यासाठी इस्राइलने हमासला मदत करून फुलणे आणि विषारी फळ देण्यास मोठी मदत केल्याचे अनेकदा अनेकांनी म्हटलेले आहे. हमासने मग हळूहळू पॅलेस्टाईनच्या उदारमतवादी नेतृत्वाला बाजूला सारले. आताही यात 90 युवक पॅलेस्टाईन आहेत. त्यांच्याकडे हजारो रॉकेट आणि लाँचर देखील आहेत. परकीय निधीदेखील आहे. तथापि, हे देखील खरे आहे की ते अद्याप इस्रायलच्या सामर्थ्यापुढे खूपच गरीब आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply