Take a fresh look at your lifestyle.

अखेर ‘त्या’ खर्चाच्या मुद्द्यावर अजितदादांचीही माघार; भाजपनेही केले निर्णयाचे स्वागत

मुंबई : महाराष्ट्रात करोना रुग्णांना सुविधा आणि लसीकरण करण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोशल मिडिया खाते सांभाळण्यासाठी थेट 6 कोटी रुपये खर्च केले जाणार होते. त्यावरून राजकारण पेटल्याने आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नसल्याचे सांगून हा निर्णय रद्द केला आहे. त्याचे भाजपने स्वागत केले आहे.

Advertisement

NCP on Twitter: “माझ्या कार्यालयाला स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही आमचे काम बोलते, त्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा – ना. @AjitPawarSpeaks https://t.co/bOXbgWiSrE” / Twitter

Advertisement

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून म्हटले होते की, लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल. पैसे जनतेचे जीव वाचवण्यासाठी खर्च करायचे नाहीत, फक्त प्रसिद्धीवर करायचे हे धोरण असल्यामुळे १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण थांबवण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.

Advertisement

आमदार भातखळकर यांच्यासह अनेकांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्याचीच दखल घेऊन असा खर्च न करण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला आहे. त्याचेही भातखळकर यांनी स्वागत केले आहे. ‘उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही. बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. चला, करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले…’ अशी प्रतिक्रिया आता त्यांनी दिली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “BJP impact उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही. बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. चला, करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले…” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply