Take a fresh look at your lifestyle.

शेळी-मेंढीच्या अनुदान योजनेचा लाभ घ्यायचाय तर वाचा ‘ही’ महत्वाची माहिती

पुणे : जिल्हास्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या शेळी व मेंढीपालनाच्य विविध योजनांमध्ये बदल करून आता शेळी आणि मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना यापुढे योजनेचा लाभ घेताना सुधारित दराने शेळ्या आणि मेंढ्या यांची खरेदी करणे शक्य होणार आहे.

Advertisement

जुन्या नॉर्मद्वारे योजनेचा लाभ घेताना शेळी आणि मेंढी यांचे भाव कागदोपत्री कमी दाखवावे लागत होते. आता त्याची अडचण दूर होणार आहे. तसेच सद्यस्थितीतील योजनांमधील शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रीमंडळाने मान्य केलेले शेळी व मेंढ्यांचे सुधारीत दर असे :

Advertisement
शेळी- उस्मानाबादी / संगमनेरी 8,000 रुपये
शेळी- बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 6,000 रुपये
बोकड- उस्मानाबादी / संगमनेरी  10,000 रुपये
बोकड- बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 8,000 रुपये
मेंढी- माडग्याळ 10,000 रुपये
मेंढी- दख्खनी व स्थानिक जाती 8,000 रुपये
नर मेंढा-माडग्याळ 12,000 रुपये
नर मेंढा-दख्खनी व स्थानिक जाती 10,000 रुपये

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply