Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पहा नेमके काय चाललेय मिडल-इस्टमध्ये; किती सोडलेत रॉकेट आणि किती बळी गेलेत युद्धात

दिल्ली : कोरोना विषाणूविरूद्ध जगभर लढाई सुरू असतानाच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अजून एक छोटेखानी हिंसक युद्ध चालू आहे. भारतासह अनेक देशांनी या दोन्ही देशांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित खेळ आता युद्धाचे रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Advertisement

हमासने इस्राइलच्या दिशेने सुमारे दीड हजार रॉकेट उडाल्याचा दावा इस्राईलने केला आहे, तथापि, इस्रायलनेही प्रत्युत्तर देत शेकडो रॉकेट्स गाझा पट्ट्यात सोडल्या आहेत. एवढेच नव्हे तर इस्राईलने आतापर्यंत आपल्या रॉकेट हल्ल्यात 65 हून अधिक पॅलेस्टाईन लोकांना ठार केले आहे. इस्राईलच्या हवाई हल्ल्यात हमासचे 11 शीर्ष कमांडर मारले गेले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, गाझा पट्टीवर इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झालेल्या पॅलेस्टाईनची संख्या 67 झाली आहे. मृतांमध्ये 17 मुलांचा समावेश आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायली हवाई हल्ल्यात 388 लोक जखमी झाले आहते. ज्यात 115 मुले आणि 50 महिलांचा समावेश आहे.

Advertisement

इस्रायलने गाझा पट्टीवर लष्करी हल्ल्याची तीव्रता वाढविली आहे. हमासनेही माघार घेण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत आणि इस्रायली शहरांमध्ये शेकडो रॉकेट उडवले आहेत. मात्र, इस्राईलच्या ‘आयरन डोम’ हवाई संरक्षण यंत्रणेने हवेमध्येच 90 टक्के क्षेपणास्त्रांना नष्ट केले आहे. आयर्न डोम ही जगातील सर्वोत्तम अँटी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा असल्याचे म्हटले जाते. इस्त्राईलचा आयर्न डोम हा अमेरिकेच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने राफेल एडवांस्ड डिफेंस सिस्टम्स आणि इजराइल एयरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी विकसित केलेली हवाई संरक्षण प्रणाली आहे.

Advertisement

गाझा शहरात कोठेही लपवता येत नाही. गाझा जवळील दक्षिणेकडील भागात सर्वांचे जीवन धोक्यात आले आहे. इस्राइलच्याही चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.

Loading...
Advertisement

यहुदी लोक आणि अरब लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र प्रस्थापित करण्याच्या धडपडीने इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष सुरू आहे. जेव्हा संयुक्त राष्ट्राने इस्रायलचे अस्तित्व 1947 मध्ये मान्य केले. तेव्हापासूनच या भागात हिंसाचार व तणाव निर्माण झाला आहे. आताही धार्मिक वादातून या भागात हिंसाचार चालू आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply