Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी; दुर्लक्ष ठरू शकते तोट्याचा भाग

मार्च महिन्यात उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारच्या तापमानात वाढ होऊन कडाक्याचे उन पडत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मानवी आरोग्याची काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे जनावरांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र होत असल्याने माणसांबरोबरच जनावरांनाही याचा त्रास होत आहे.

Advertisement

या दिवसात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे जास्त कल असतो, तसेच उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते. त्यामुळे या काळात जनावरांचे आरोग्य सांभाळणे महत्वाचे ठरते.

Advertisement

उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्‍यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो. गाईंपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्‍यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो.

Advertisement

म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे. दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे गरजेचे आहे. गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी झाडे असणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे.

Advertisement

शक्‍य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्‍यक आहे, शक्‍य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते. जनावरांना दिवसातून किमान एकदा तरी खरारा करावा. खराऱ्यासाठी नारळाच्या काथ्याचा वापर करावा. खरारा करतेवेळी तो सोयीचा व हळुवारपणे करावा. त्यामुळे जनावरास थोडे तरतरीत वाटते.

उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागते. या काळात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात जनावरांना लाळ खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस द्यावी. जेणे करुन जनावरे आजारी पडणार नाहीत. जनावरांचा गोठा आणि आसपासचा परिसर साफ ठेवावा.
 
चारा आणि पाणी

उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाच वेळी देण्याऐवजी समान प्रमाणात विभागणी करुन तीन  ते चार वेळेस द्यावा. चारा वाया जाणार नाही यासाठी चाऱ्याची बारीक कुट्टी करावी. चारा कुट्टी करुन जनावरांना खायला दिल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी होते. केवळ दोन टक्के चारा वाया जातो.

Loading...
Advertisement

याउलट जर चारा तसाच दिला गेल्यास यातील जवळपास ३३ टक्के चारा वाया जातो. कुट्टी केलेला चारा टोपल्यात किंवा लाकडाच्या गव्हाणीत टाकून खाऊ घालावा. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.

Advertisement

चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये कडुनिंब, अंजन, वड, पिंपळ, शेवरी इत्यादी झाडांची ओली पाने, हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, उसाचे वाढे यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. जनावरांना पाणी देताना दिवसातून एक ते दोन वेळा देण्याऐवजी तीन ते चार वेळा पाणी द्यावे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply