Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून गृहमंत्र्यांनी द्यावा राजीनामा; भाजपने केले ‘ते’ मुद्दे उपस्थित

मुंबई :

Advertisement

दुपारी चालणारे सरकार आता सकाळी नऊ वाजता चालते, राज्यातील जनतेच्या हितासाठी चालत आहे की, वाझे प्रकरणांमध्ये स्वतःची अडचणींमधून सोडवणूक करण्यासाठी चालत आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर केली आहे. 

Advertisement

वाझे प्रकरणांमध्ये अनेक बैठका होत असल्याचे दिसून येत आहे त्यावर दरेकर म्हणाले, आदरणीय पवार साहेबांपासून ते दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे, निश्चितपणे या प्रकरणाचे धागेदोरे उच्च पोलिस अधिकाऱ्यांसहित इतर राजकीय नेत्यांसोबत पोहोचतात की काय आणि त्याच चिंतेमुळे या बैठका होत आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न जनतेसमोर उभं राहत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Advertisement

सचिन वाझे प्रकरणामुळे अनिल देशमुख यांची उचलबांगडी होत असताना यामध्ये इतर कोणी उच्च अधिकारी आहे, तसेच राजकीय वरदहस्त कोणाचा आहे? असा सवाल करताना दरेकर यांनी केला तसेच या गोष्टी सुद्धा पुढे येण्याची आवश्यकता आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी स्वतः खात्याचा प्रमुख म्हणून राजीनामा द्यावा असे दरेकर यांनी सांगितले.

Advertisement

दरेकर म्हणाले की, पूजा हत्या प्रकरणात २० दिवस एफआयआरला लागले त्यानंतर २ दिवस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा खिशात ठेवला तोपर्यंत सर्व पुरावे नष्ट झाले, तसेच या प्रकरणात  नंबर प्लेट बघितल्या गेल्या, डिजिटल शूटिंग काढण्यात आल्या आहे, तसेच सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केल्याचा संशय एनआयने केला आहे, परंतु पोलिसांच्या रेकॉर्डवर काहीचनाही याचा अर्थ तुम्ही ते सगळे कागद घेतले आणि नष्ट केले का? असा सवाल दरेकर यांनी केला.

Advertisement

सरकार कारवाई उशिरा करत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. दस्तावेज, पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार गुन्हेगाराना वेळ तर देत नाही ना? अशा प्रकारची भूमिका सरकार घेत असल्याचे संजय राठोड प्रकारनावरून दिसून आले. या सर्व बाबीतून हे प्रकरण पूर्वनियोजित असल्याचा मोठा कट असावा अशा प्रकारचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येते अशा प्रकारची टीका दरेकर यांनी केली.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply