Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. गिलख्रिस्टनंतर अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत ठरला दुसरा खेळाडू..!


मुंबई :

आस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि विकेटकीपर राहिलेल्या ॲडम गिलख्रिस्टनंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये कसोटी शतके ठोकण्याची कामगिरी करणारा भारतीय संघाचा फलंदाज व विकेटकीपर ऋषभ पंत हा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

Advertisement

पंतने इंग्लंडविरूद्ध मोतेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडविरुद्ध १०१ धावा केल्या आणि कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. पंतच्या आधी ही कामगिरी ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर फलंदाज ॲडम गिलक्रिस्टने केली असून या देशांमध्ये कसोटीत शतक ठोकले आहे.

चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतने शतक ठोकले. पंतने इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या चेंडूवर सिक्सर मारत आपले शतक पूर्ण केले. मात्र शतक झळकावल्यानंतर पंत जास्त काळ टिकू शकला नाही आणि तो बाद झाला. पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे, परंतु त्याने भारतीय भूमीवर प्रथमच कसोटीत १०० धावा केल्या आहेत.

दरम्यान पंत सर्वाधिक शतके ठोकणारा भारताचा तिसरा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. या शतकाच्या जोरावर त्याने कसोटी सामन्यात तीन शतके ठोकणाऱ्या भारताचा आणखी एक विकेटकीपर वृध्दिमान साहाची बरोबरी केली. या यादीमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या स्थानावर आहे, ज्याने कसोटी सामन्यात १४४ डावात ६ शतके ठोकली आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Loading...
Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply