Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

येत्या 1 तारखेला कामगार कायदा होणार लागू; कामाच्या तासासह ‘त्या’ गोष्टीत होणार बदल

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून कृषी कायदे आणि कामगार कायदे चर्चेत आहेत. अशातच आता 1 एप्रिलपासून कामगार कायदे लागू होणार आहेत. पुढील दोन आठवड्यांत यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार असल्याचे समजत आहे.

Advertisement

कामगार मंत्रालयाच्या लेबर रिफॉर्म सेल (Labour Reform cell) च्या अधिकाऱ्याने टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीला सांगितले की, पीएफ आणि वार्षिक सुट्टीसाठी कामगार संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलीय. याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. यापूर्वी बर्‍याच सभांमध्ये या विषयांवर चर्चा झाली होती. लवकरच निर्णय घेण्यात येईल. 

Advertisement

अर्जित रजेची मर्यादा सध्या 240 दिवस आहे, ती 300 दिवसांपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी युनियनकडून करण्यात आल्याचेही समजते. कर्मचार्‍यांचे कामकाजाचे तास, वार्षिक सुट्टी, पेन्शन, पीएफ, घर पगार, सेवानिवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांमधील नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. 1 एप्रिलपूर्वी नवीन नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कारण 1 एप्रिलपासून नवीन वेतन संहिता लागू करावी लागेल. 

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply