Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ज्योतिरादित्यांनी दिले राहुल गांधीना ‘हे’ प्रत्युत्तर; पहा काय हाणलाय टोला..!

दिल्ली :

Advertisement

भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावरचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेले एक उदाहरण सध्या चर्चेत आहे. त्यावर ज्योतिरादित्य यांनीही दणक्यात प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या युथ विंगला संबोधित करताना उदाहरण म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव वापरल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जर ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेस पक्षात असते तर मुख्यमंत्री होऊ शकले असते. तिकडे म्हणजे भाजपात जाऊन ते बॅकबेंचर बनले आहेत.

Advertisement

ANI on Twitter: “It would have been a different situation, had Rahul Gandhi been concerned the same way as he is now, when I was in Congress: BJP MP Jyotiraditya Scindia on Rahul Gandhi’s statement that he has become a backbencher in BJP https://t.co/EjlYXEWFxe” / Twitter

Advertisement

पक्षाचे महत्व आणि पक्षासाठी काम करण्याला किती महत्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उदाहरणाने केला आहे. मात्र, त्यानंतर आता ज्योतिरादित्य यांनीही आपली भूमिका मोजक्या शब्दात स्पष्ट केली आहे.

Advertisement

ज्योतिरादित्य यांनी म्हटले आहे की, जर मी काँग्रेस पक्षात होतो त्यावेळी माझी अशीच काळजी घेतली असती तर पक्षाची परिस्थिती वेगळी असती. ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये जाताना सुमारे 20 आमदार फोडले होते. त्यामुळे मध्यप्रदेश या मोठ्या राज्यातील सत्ता काँग्रेस पक्षाने गमावली आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply