Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘ज्या’ डेलकरांच्या आत्महत्येवरून महाविकास आणि भाजपमध्ये चालूय राजकारण; वाचा, कोण होते डेलकर आणि काय आहे प्रकरण

मुंबई :

Advertisement

काही दिवसांपूर्वी देशाच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर अनेक धक्कादायक गोष्टी घडताना दिसत होत्या. अशातच राजकीय वर्तुळातून अजून एक हादरवणारी बातमी समोर आली होती. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक बड्या अधिकार्‍यांची आणि मंत्र्यांची नावे आहेत. ही नावे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र या नावांचा डेलकर यांच्या आत्महत्येशी थेट संबंध असण्याची शक्यता आहे.  

Advertisement

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी SIT मार्फत केली जाईल, अशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. सुसाईड नोटमध्ये खेडा पटेल यांच्याशिवाय अनेक नेत्यांची नावे नमूद आहेत असे पुढे देशमुख म्हणाले.

Advertisement

दादरा-नगर हवेली प्रशासक प्रफ्फुल खेडा पटेल हे अगोदर गुजरातचे गृहमंत्री देखील होते. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. 

Advertisement

खासदार मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी जवळचे सहकारी होते”, असा दावा अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला.

Advertisement

भाजपकडून सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आणि राजकीय सूडापोटी राज्य सरकार काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर प्रकरणी विधानसभेत निवेदन सादर केलं.

Advertisement

खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहलं असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. तसंच, डेलकर यांच्या पत्नी व मुलगा यांनीही आपल्याला पत्र लिहत चौकशीची विनंती केली आहे,’ असंही यावेळी गृहमंत्र्यांनी नमूद केलं.

Advertisement

कोण होते डेलकर :-

Loading...
Advertisement

डेलकर हे दमण आणि दीव या लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून काम करणारे स्वतंत्र राजकारणी होते.  

Advertisement

ते तब्बल सात वेळा खासदार होते. 

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply