Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पोलीस अधिकारी वाझे यांच्या अटकेसाठी फडणविसांनी केली ‘आग्रही’ मागणी..!

मुंबई :

Advertisement

मुंबई पोलीसमधील कार्यक्षम आणि जिगरबाज अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सचिन वाझे यांच्यावर शिवसेनेसाठी काम केल्याचे आरोप अनेकदा झालेले आहेत. मात्र, आता व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे नाव जोडले गले आहे.

Advertisement

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधिमंडळात निवेदन केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूसंदर्भात आणखी काही विषय आज विधानसभेत मांडले आहेत. सचिन वाझे यांच्याकडे ते वाहन ४ महिने होते, असे समजते. तिन्ही दिवस हिरेन यांची चौकशी सचिन वाझे यांनीच केली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र त्यांनीच हिरेन यांच्याकडून तयार करून घेतले. त्यांना अटक होण्याचा सल्ला सचिन वाझे यांनीच दिला होता.

Advertisement

Devendra Fadnavis on Twitter: “..यांनीच दिला, २/३ दिवसात बाहेर काढण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनीच दिले! या सर्व बाबी तसेच त्यांचा खून वाझे यांनीच केला असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने FIR मध्ये व्यक्त केला आहे. कोण आणि कशासाठी त्यांना वाचविते आहे? सचिन वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे! (2/2) #BudgetSession” / Twitter

Advertisement

पुढे त्यांनी म्हटले आहे की, २/३ दिवसात बाहेर काढण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनीच दिले! या सर्व बाबी तसेच त्यांचा खून वाझे यांनीच केला असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने FIR मध्ये व्यक्त केला आहे. कोण आणि कशासाठी त्यांना वाचविते आहे? सचिन वाझे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे!

Advertisement

एकूणच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेली कार सापडणे आणि ती कार हिरेन यांची असणे या गोष्टीला आता इतर कंगोरे जोडले जात आहेत. यातले खरे-खोटे हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे. मात्र, यामुळे महाविकास आघाडीवर भाजपने जोरदार टीका करण्याची संधी साधली आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील      

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply