Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अॅग्री इंडिया हॅकॅथॉनमध्ये चमकला ‘फुले रोबो’; पहा किती गुणी आहे हा रोबोट

अहमदनगर :

Advertisement

केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, पुसा, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अॅग्री इंडिया हॅकॅथॉनचे फेब्रुवारी २०२१ मध्ये फुले रोबो या रोबोटला पुरस्कार मिळाला आहे.

Advertisement

हॅकॅथॉनसाठीे ६ हजार पेक्षा जास्त प्रकल्पांंनी आपली नोंदणी केली होती. त्यामध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे सदस्य डॉ. सचिन नलावडे यांनी सादर केलेल्या फुले रोबो काटेकोर पीक संरक्षणासाठी रिमोट संचलित छोटेखानी स्वयंचलित यंत्राला एक लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे.

Advertisement

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत इन्क्युबेशन,तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करणे व त्यामध्ये योग्य सुधारणा करण्यासाठी ५ ते २५ लाख रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी हा प्रकल्प पात्र ठरल्याने विद्यापीठातील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

फुले रोबो’, रोबोटीक हावेस्टर आणि व्हेरीयबल रेट फल्टीराझल अॅप्लीकेटर या तीन प्रकल्पांची पुढील टप्पासाठी निवड झाली.फुले रोबो’ हा पहिल्या ६० प्रकल्पांमधे महा अंतिम फेरीसाठी निवडला गेला आहे.

Advertisement

फुले रोबो हा ड्रोनसारखा मात्र जमिनीवर चालणारा प्रोजेक्ट आहे. ८० किलो वजनाचा रोबो एका वेळेस ७० लिटर औषध फवारणीचे काम करू शकतो. भविष्यात रोबोकडून गवत कापणी, फळबागेची निगा तसेच राखणदारीच्या कामासाठी वापर केला जाणार आहे. टेकडी तसेच चढउताराच्या ठिकाणी देखील रोबोचे कामकाज चालणार आहे, असे डाॅ. सचिन नलावडे यांनी म्हटले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील      

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply