Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ आंदोलकांच्या अटकेवर दरेकरांनी केली टीका; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

श्रमजीवी संघटना ही आदिवासी गरीब दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून कालच महिला दिनानिमित्त सभागृहाने महिलांचा गौरव केला असताना आज श्रमजीवी संघटनेच्या उपकार्याध्यक्षा स्नेहा पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची बातमी उघड झाली आहे, ही गंभीर बाब असून त्यांना तत्काळ सोडावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.

Advertisement

श्रमजीवी संघटना आणि संघटनेच्या उपकार्याध्यक्षा स्नेहा पंडित गेल्या आठवड्याभरापासून खावटी अनुदान आणि आदिवासींच्या जमिनीसंदर्भात राज्यात आंदोलन करीत आहेत, आज ९ मार्च रोजी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आदिवासी मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी गेले होते, त्यावेळी स्नेहा पंडित व ७० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

आदिवासी श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्या स्वतःच्या मागण्यांसाठी लढत नव्हत्या तर आदिवासींच्या न्यायासाठी लढत होत्या,  लोकशाही मार्गाने आंदोलन करीत होत्या, त्यामुळे संवेदनशील महिला आणि उपसभापती म्हणून आपण स्वत: यात लक्ष घालून, आवश्यकता वाटली तर बैठक आयोजित करुन आदिवासींचा विषय मार्गी लावावा, तसेच त्यांची तत्काळ सुटका करण्याबाबत सरकारला सूचना द्याव्यात, अशी विनंती दरेकरांनी सभागृहात केली.

Advertisement

संपादन : सचिन पाटील      

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply