Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांनी बजेटवर उपस्थित केला ‘तो’ महत्वाचा मुद्दा..!

मुंबई :

Advertisement

सर्व घटकांचा अपेक्षाभंग करणारा निराशाजनक अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ एक रडगाणे आहे, अशी टीका करतानाचा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा, हाही प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा? हाही प्रश्न निर्माण होतो आहे. ट्रान्सहार्बर लिंक, वांद्रे- वर्सोवा हे सारे आमच्या काळात सुरू झालेले प्रकल्प आहेत. तीर्थक्षेत्र विकासाचे सारे प्रकल्प सुद्धा आमच्या काळात सुरू झालेले, त्यामुळे त्यातही काहीही नवीन नाही. सद्या कोरोनाचा काळ असल्याने कामगार, बारा बलुतेदार यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती, पण ती सुद्धा फोल ठरली.

Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सत्ताधारी सदस्य रोज फलक घेऊन यायचे, पण राज्याने पेट्रोवरील आपल्या 27 रुपये नफ्यातील एकही रुपया कमी केला नाही. महिलांसाठी अ‍ॅप्रेंटिस योजनेला रोजगाराची योजना दाखवून आज महिला दिनीच महिलांची फसवणूक केली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारे एकही पाऊल त्यात उचलण्यात आलेले नाही.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply