Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांनी केली अजितदादांच्या बजेटची ‘अशी’ चिरफाड; पहा कोणते मुद्दे मांडलेत त्यांनी

मुंबई :

Advertisement

शेतकरी, युवा, महिला, मागासवर्गीय अशा सर्वच घटकांचा अपेक्षाभंग करणारा, हा राज्याचा निराशाजनक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प खरे सांगायचे तर निव्वळ एक रडगाणे आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Advertisement

राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाल्यानंतर विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की, एखाद्या विशिष्ट भागाचा हा मोठाच प्रश्न अर्थसंकल्प पाहिल्यानंतर निर्माण होतो. शेतकरी कर्जमाफीतील नियमित कर्ज भरणार्‍यांसाठी प्रोत्साहन योजनेसाठी किंवा ओटीएस योजनेसाठी कोणतीही आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात नाही. आधीच मूळ कर्जमाफी योजनेत 45 टक्के शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. राज्यातील ठाकरे सरकारची कर्जमाफी ही आजवरची सर्वात फसवी कर्जमाफी आहे, हेच यातून सिद्ध झाले. कापूस, बोंडअळीचे नुकसान किंवा सोयाबीन, धान उत्पादक यासंदर्भात कुठलीही मदत या सरकारने केलेली नाही. वीज बिलाच्या संदर्भात केलेली घोषणा सुद्धा फसवी आहे. 50 टक्के सवलत दिली तरी कमी झालेले देयक हे 75 हजारांवर जाते. त्यामुळे आधी बिलातील दुरुस्ती केली पाहिजे, पण ते सरकार करणार नाही.

Advertisement

3 लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज या योजनेचा राज्यातील 80 टक्के शेतकर्‍यांना काहीही लाभ होणार नाही. कारण हे कोरडवाहू शेतकरी कधीही 50 हजार ते 1 लाख यापेक्षा अधिक कर्ज घेत नाही. त्यामुळे केवळ नावापुरती ही घोषणा आहे. पायाभूत सुविधांचे कोणतेही नवे प्रकल्प अर्थसंकल्पात नाहीत. जे आहेत, ते सर्व केंद्र सरकारचे आहेत. या प्रकल्पांचा आपल्या अर्थसंकल्पात उल्लेख करताना यासाठी केंद्र सरकारने निधी दिला, हे सांगण्याचे सौजन्य राज्य सरकारने दाखविलेले नाही. सिंचन किंवा पाणी पुरवठा योजना यात सुद्धा केंद्र सरकारने निधी निधी देते आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply