Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला दारूचा आधार; पहा काय निर्णय झालय तो

मुंबई :

Advertisement

राज्याच्या घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे महत्वाचे आणि जबाबदारीचे काम आता पुन्हा एकदा दारू या घटकावर आलेले आहे. त्यामुळेच यंदाच्या बजेटमध्ये दारूवरील कर वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे.

Advertisement

यंदाचा अर्थसंकल्प १० हजार २२६ कोटी तुटीचा आहे. त्यातही ही तुट कमी होण्यासाठी दारूवरील कर वाढवण्यात आलेला आहे. आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारने मद्यावरचा कर वाढवण्याचे ठरवले आहे.

Advertisement

देशी मद्याचे ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड असे दोन प्रकार निश्चित करण्यासह देशी ब्रँडेड उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रति लिटर यापैकी जे अधिक असेल तो लागू करण्यात येणार आहे. याद्वारे राज्याला अंदाजे ८०० कोटी अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.

Advertisement

पवार म्हणाले की, मद्यावरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ख नुसार सध्याचा मूल्यवर्धित दर ६० टक्क्यांवरून ६५ टक्के, तर मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१/५ नुसार मद्यावर सध्या असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर ३५ वरून ४० टक्के वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे राज्याला १ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply