Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून फडणवीसांनी घेरले महाराष्ट्र सरकारला; पहा कोणते गंभीर मुद्दे उपस्थित केलेत त्यांनी

मुंबई :

Advertisement

करोना रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. याच दुर्दैवी मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासह अनेक गंभीर मुद्दे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहेत.

Advertisement

देशाच्या ४० टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झालेले आहेत. एकट्या महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांचं प्रमाण ४६ टक्के आहे. करोना चाचण्यांची संख्या कमी कमी होत आहे. तरीदेखील करोना संक्रमणाची जी परिस्थिती पाहायला मिळतेय ती आश्चर्यजनक आहे आणि यात काय चाललंय ते कळत नाहीये, अशी शंका फडणवीस यांनी उपस्थित केली आहे.

Advertisement

महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या ९ टक्के आहे. महाराष्ट्रात करोनामुळं ५२ हजार १८४ मृत्यू झाले आहेत, म्हणजे ३३ ते ३४ टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहे. कशाची पाठ थोपटून घेतो आपण. त्यामुळं मला कधी कधी खरंच वाटतं की राज्य डॉक्टरचा सल्ला घेतंय की कंपाउडरचा, असा खोचक प्रश्न फडणवीस यांनी केला आहे.

Advertisement

अमरावतीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरही फडणवीसांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी म्हटले आहे की, वी मुंबईत चाचण्या न करताच पॉझिटिव्ह अहवाल देण्याचं रॅकेट समोर आले आहे. तसेच अमरावतीत पॉझिटिव्ह अहवाल देण्याचं रॅकेट सक्रीय आहे. रुग्णसंख्या खरंच वाढतेय का, की याच्यामागे काय नेमकं आहे, असे प्रश्न समोर येत आहे. अमरावतीत जिल्हा परिषदेच्या सदस्यानं चाचणी केल्यानंतर त्यांना फोन आला तुम्हाला रिपोर्ट पॉझिटिव्ह हवाय की निगेटिव्ह, असे जर होत असेल तर आकडेवारी कितपत खरी आहे?

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply