Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 : अजितदादांनी दिले धर्मांधांना आव्हान; पहा कोणता प्रकल्प केलाय जाहीर

मुंबई :

Advertisement

देशात सध्या बोगस वैज्ञानिक शोध आणि माहिती पेरून सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग अनेक धर्मांध मंडळी करीत आहेत. त्या सर्वांच्या समाजविघातक प्रयत्नांना हाणून पडण्यासाठीचे कार्य आता महाराष्ट्र सरकार करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची घोषणा केली आहे.

Advertisement

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या काळात देशात जाणीवपूर्वक फसव्या विज्ञानाचा प्रचार होत आहे. हा छद्म विज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क उभारण्यात येणार आहे.

Advertisement

सध्या देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रचार होत आहे. अशा परिस्थितीत भावी पिढीच्या मनात अभिजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक महसूल मुख्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक अशा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे पवारांनी जाहीर केले.

Advertisement

बईतील नेहरू सेंटरच्या नुतनीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. या सर्व योजना आणि प्रयत्नांचे स्वागत विचारवंत आणि संशोधकांनी केले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply