Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 : मुंबईसाठी जाहीर झाल्यात ‘त्या’ महत्वाच्या योजना व प्रकल्प

मुंबई :

Advertisement

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरासाठी महत्वाचे प्रकल्प जाहीर केले आहेत.

Advertisement

मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांभोवती असलेल्या जलमार्गांचा वाहतुकीसाठी वापर करण्यासह वसई-कल्याण ही जलमार्ग सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Advertisement

मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ-कल्याण फाटा, शीळ फाटा व कल्याण फाटा जंक्शनवर उड्डाणपूलाची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण, कल्याण फाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे. त्याला गती दिली जाणार आहे.

Advertisement

पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल.

Advertisement

वांद्रे, वर्सोवा-विरार यासाठी मोठा निधी जाहीर झाला आहे. तसेच कोस्टल रोडचे काम जलदगतीने सुरू असून २०२४ पूर्वी हा मार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे.

Advertisement

महाराष्ट्र संकुलातील उद्यानाला जोडण्यासाठीच्या पादचारी पुलासाठी ९८ कोटी ८१ लाखांची तरतूद केली आहे. बीकेसीमधील सायकल मार्गावर बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींना चांगला प्रतिसाद आहे.

Advertisement

मुंबईच्या पूर्व व मुंबई पालिकेच्या माध्यमातून वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी १९ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Loading...
Advertisement

मिठी नदी पुनरूज्जीवित प्रकल्प मार्च २०२१पासून सुरू होणार असून त्यासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Advertisement

मुंबईल्या दहिसर, बोईसर व ओशिवरा नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी १ हजार ५५० कोटींची कामे सुरू करण्यात येत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply