Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बजेट २०२१ : आरोग्याला दिले प्राधान्य; पहा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार वैद्यकीय महाविद्यालये

मुंबई :

Advertisement

महाविकास आघाडी सरकारचे यंदाचे बजेट हे शेती आणि आरोग्य या दोन सेक्टरकडे विशेष लक्ष देणारे ठरले आहे. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यासह बाजार समितींच्या बळकटीकरणासाठी मोठा निधी देण्यात आलेला आहे.

Advertisement

जिल्ह्यात कोविड उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

Advertisement

तसेच मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारणारण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात या आरोग्य सुविधांसाठी ५ हजार कोटींचा निधी देण्यात येणार असून ८०० कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे.

Advertisement

ज्या रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणांची आवश्यकता आहे तिथे अशा उपकरणांची तरतूद करण्यात येणार आहे.

Advertisement

अमरावती, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड येथे नवीन शासकीय मेडिकल स्थापन करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.

Loading...
Advertisement

सार्वजनिक विभागाच्या आरोग्य संस्थाचे बांधकाम श्रेणीवर्धन करण्याच्या उद्देशाने ७ हजार ५०० कोटींचा विशेष प्रकल्प राबवण्यात येईल. जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मनो रुग्णालय आदि रुग्णालयांचे बांधकाम व नवीन रुग्णलयांचे श्रेणीवर्धन व बांधकाम यांचा यात समावेश आहे. 

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply