Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्थसंकल्प न्यूज : शेतकऱ्यांसाठी केल्या ‘त्या’ महत्वाच्या घोषणा; ० % व्याजाने मिळणार कर्ज..!

मुंबई :

Advertisement

महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला जात आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने अनेक महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. वित्तमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

Advertisement

 एपीएमसीच्या (बाजार समित्या) बळकटीकरणासाठी २ हजार कोटी आणि  विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

Advertisement

कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

Advertisement

कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील ४ कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी २०० कोटी दरमहा देण्यात येतील.

Advertisement

मागील वर्षी ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले. शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. यंदा ४२ हजार कोटींचे पीक कर्जाचे वाटप झालेले आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने मिळणार आहे. कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Loading...
Advertisement

कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५०० कोटींचा महावितरणला निधी देण्याची घोषणा पवारांनी केली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply