Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गंभीरच की.. व्हाटस्अॅपवर मोदी, अंबानी, अमिताभ यांच्या नावाने लॉटरी आणि फसवणूकही..!

पुणे :

Advertisement

ठग म्हणजे सामान्य माणसांसह सर्वांनाच लुटणारा अवलिया चोर. नव्य जमान्यात तंत्रज्ञानाची कमाल करून सर्वांना फसवण्याचा खेळ सुरू झालेला आहे. त्यातलाच नवा प्रकार जगजाहीर झाला आहे. त्याला निमित्त ठरले आहे केबीसी व्हाटस्अॅप लॉटरी प्रकरणाचे.

Advertisement

काैन बनेगा कराेडपती या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या टीव्ही कार्यक्रमाशी साधर्म्य असलेल्या नावाचा वापर करतानाच यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या फोटोचाही वापर यात केलेला आहे.

Advertisement

व्हाॅटस‌् अॅपवर, एक रंगीबेरंगी अाकर्षक प्रमाणपत्र येते, ज्यावर पंतप्रधान माेदी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ अाणि अंबानी यांचे फाेटाे अाहेत. २५ लाख रुपयांची लाॅटरी तुम्हाला लागली असून ती या तिघांच्या हातून काढल्याचे म्हटलेले असते.

Advertisement

पुढे या मेसेजसाेबत एक व्हाॅइस मेसेजही येत असून या ड्राॅमधील पैसे मिळविण्याकरीता प्रमाणपत्रावर दिलेल्या क्रमांकावर केवळ व्हाॅटस‌् अॅप काॅल करण्याचे अार्जव केले जाते.

Advertisement

प्रमाणपत्रावर दिलेल्या माेबाइल क्रमांकावर केवळ व्हाॅटसअॅप काॅल करावा, कारण लाॅटरी व्हाटस‌् अॅपवर लागली असल्याचे कारण दिले जाते. स्टेट बॅेकेच्या मुंबइच्या शाखेतील मॅनेजरचा असून त्याने विचारलेली सगळी माहीती द्या असेही सांगितले जाते. मात्र, यानंतर खरा खेळ सुरू हाेताे व काॅल करणारा जागृत नसेल तर त्याची अाॅनलाइन फसवणूक होऊ शकते.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply