Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रामदास आठवलेंनी टाकली गुगली; स्वपक्षापेक्षा ‘मित्रा’च्या बाजूनेच तुफान गोलंदाजी..!

कोल्हापूर :

Advertisement

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारपुढे गुगली फेकली आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या ऐवजी थेट मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या बाजूने तुफा गोलंदाजी केली आहे.

Advertisement

सातारा येथे त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीवर नाराज असल्याने काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल आणि लवकरच भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येईल. राज्यातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, जे पक्ष कधीही एकत्र येणार नाहीत, ते सत्तेसाठी आता एकत्र आले आहेत. पण जे एकत्र होते, ते बाजूला गेले आहेत. देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र, ही घोषणा अनेकदा केली त्या वेळी शिवसेनेने विरोध केला नाही.

Advertisement

काँग्रेसने पाठिंबा काढला तर हे सरकार जाऊ शकते. सध्या शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री भ्रष्टाचारात सापडले आहेत, आता काँग्रेसचा मंत्री बाकी आहे.. ईडी, आयकर, सीबीआय यांच्या धाडी नको असतील तर उद्योगपती, राजकीय नेत्यांनी चांगले धंदे करावेत. शेतकरी आंदोलनाला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply