Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी’ रंगणार आयपीएलचा थरार; पहा नेमके काय आहे वेळापत्रक

मुंबई :

Advertisement

बीसीसीआयने रविवारी आयपीएलच्या १४ व्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केले असून ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान ही स्पर्धा खेळली जाईल. २०१९ नंतर प्रथमच ही स्पर्धा भारतात होणार असून कोरोनामुळे गेल्या वर्षी युएईत सामने खेळले गेले होते. यंदा या स्पर्धेचे सामने अहमदाबाद, बेंगळूरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे होतील.

Advertisement

IndianPremierLeague on Twitter: “🚨 BCCI announces schedule for VIVO IPL 2021 🚨 The season will kickstart on 9th April in Chennai and the final will take place on May 30th at the Narendra Modi Stadium, Ahmedabad. More details here – https://t.co/yKxJujGGcD #VIVOIPL https://t.co/qfaKS6prAJ” / Twitter

Advertisement

आयपीएल स्पर्धेचा यंदा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या एमए चिंदरबरम स्टेडियमवर होईल. एकूण ५६ सामन्यांपैकी प्रत्येकी १० सामने चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू येथे खेळले जातील. अहमदाबाद आणि दिल्ली येथे ८-८ सामने होणार आहेत. वेळापत्रकातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्व संघ तटस्थ ठिकाणी खेळतील. कोणताही संघ होमग्राऊंडवर खेळणार नाही.

Advertisement

IndianPremierLeague on Twitter: “#VIVOIPL is back in India 🇮🇳 🙌 Time to circle your favorite matches on the calendar 🗓️ Which clashes are you looking forward to the most? 🤔 https://t.co/kp0uG0r9qz” / Twitter

Advertisement

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सर्व प्लेऑफ सामने खेळले जातील. यात ३० मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याचा समावेश आहे. या स्पर्धेत ११ डबल हेडरचा समावेश आहे, म्हणजेच एका दिवसात दोन सामने खेळले जातील. दुपारी साडेतीन वाजता सामन्यांना प्रारंभ होईल. त्याचबरोबर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून दुसरा सामना खेळला जाईल.

Loading...
Advertisement

IndianPremierLeague on Twitter: “How’s that for numbers 💥💥 Here are the 🔝5️⃣ buys in the @Vivo_India #IPLAuction https://t.co/SPagm8laZo” / Twitter

Advertisement

स्पर्धेचे वेळापत्रक असे तयार करण्यात आले आहे की एखाद्या संघाला केवळ तीन वेळा प्रवास करावा लागेल. प्रारंभीचे सामने रिकाम्या स्टेडियमवर प्रेक्षकांशिवाय खेळले जातील. लीग फेरी दरम्यान प्रेक्षकांना परिस्थिती पाहून उपस्थित राहू द्यायचे की नाही याचा विचार केला जाईल.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply