Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना लाभ न दिल्याने ‘तो’ अधिकारी संकटात; आली थेट शिस्तभंगाची नोटीस..!

सोलापूर / उस्मानाबाद :

Advertisement

शेतकऱ्यांना योजनांचा लाभ न देता त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोणावरही कारवाई झाल्याचे उदाहरण ऐकण्यात किंवा पाहण्यात आहे का? नाहीच ना? मात्र, पगार घेऊन शेतकरी ग्राहकांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका एका अधिकाऱ्यांना बसला आहे. पण, हे अधिकारी बेजबाबदार कृषी विभागाचे नसून महावितरण कंपनीचे आहेत..!

Advertisement

उद्दिष्टपूर्तीत असमाधानकारक कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठांनी नाराजी व्यक्त करत याप्रकरणी सात दिवसात खुलासा सादर करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांना देण्यात आला असल्याचे दिव्य मराठी यांच्या बातमीत म्हटले आहे.

Advertisement

याला निमित्त ठरले आहे ते, राज्य शासनाच्या उर्जा विभागाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कृषी धोरण २०२० ही योजना गतवर्षी आणली होती. यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांचे व्याज व दंडव्याजात सवलत देऊन उर्वरित रक्कम भरून घेण्यासाठीचे उद्दिष्ट पूर्ण न करण्याचे.

Advertisement

राज्य शासनाने शेतकऱ्यांना वीलबिलात दिलासा देण्यासाठी कृषी धोरण २०२० ही वीजबिल सलवत देणारी योजना जाहीर केली होती. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ५० हजार ७१० वीजग्राहक पात्र होते. त्यांच्याकडे ११०८.५० कोटी रुपयांची मार्च २०२० अखेर थकबाकी होती. तर सप्टेंबर २०२० वर ४४.१८ कोटी थकबाकी होती. परंतु, उर्जा विभागाने जिल्ह्यास सदरील योजनेंतर्गत ५९८.४३ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यातून अवघे २ कोटी १३ लाख रुपयेच वसुल झाले.याबद्दल वरिष्ठांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधीक्षक अभियंता पाटील यांना याबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply