Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कष्टाला फळ आले, रताळ्याचे दणक्यात पैसे झाले; पहा १५ गुंठ्यांत ‘इतके’ झालेय उत्पादन..!

अहमदनगर :

Advertisement

शेती म्हणजे जगण्याचे आणि जागवण्याचे साधन. अवघ्या जगाच्या पोटाची भरती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शेतीतून कित्येकदा नफा हाती लागतो. असाच दमदार नफा हाती लागला आहे राहुरी तालुक्यातील म्हैसगावच्या प्रगतशील शेतकरी बापुसाहेब गागरे व विलास गागरे यांना.

Advertisement

नोव्हेंबर २०२० मध्ये रताळ्याचे पीक १५ गुंठे क्षेत्रात घेण्याचे नियोजन त्यांनी केले. काळ्या कसदार जमिनीत शेणखताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने रताळी बेण्याची लागवड केली. शेतीत यंदा पाण्याची समाधानकारक व्यवस्था असल्याने रताळ्याचे पीक देखील जोमदार आले आहे. यातून किमान ६० क्विंटल इतके उत्पादन निघण्याची अपेक्षा त्यांना आहे.

Advertisement

आतापर्यंत त्यांनी २ गुंठे क्षेत्रातील रताळ्याची काढणी केली असता ४०० किलो उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकले आहे. रताळ्याला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत घाऊकमध्ये १५ ते १७ रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. तर, किरकोळ व्यावसायिकांकडून रताळ्याची ३० ते ४० रुपये किलो बाजारभावाने विक्री केली जात आहे. गागरे यांनी दोन्ही पद्धतीने विक्रीचे नियोजन केले आहे.

Advertisement

बापुसाहेब गागरे याबाबत सांगतात की, शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा अवघ्या १५ गुंठे क्षेत्रात सेंद्रीय पद्धतीने केलेल्या रताळे या कंदाचे ६००० किलो उत्पादन हे दिलासादायक ठरले आहे. काळ्या कसदार जमिनीत शेणखताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने रताळी बेण्याची लागवड केल्याने हे कंद वजनदार होण्यासाठी मोठी मदत झाली.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply