Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून घसरलेत कांद्याचे भाव; पहा पुढील महिनाभरात काय राहील मार्केटची परिस्थिती

पुणे :

Advertisement

सध्या कांद्याचे भाव कमी झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यातच परराज्यातील कांदा आता बाजारात यायला सुरुवात झाल्याने पुढील कालावधीत भाव असेच कमी-जास्त राहून विशेष वाढणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

घोडेगाव (ता. नेवासा, अहमदनगर) येथील कांदा व्यापारी शरद सोनवणे यांनी म्हटलेले आहे की, इतर राज्यात कांदा पीक असल्यामुळे महाराष्ट्रीयन कांद्यास मागणी कमी झाली. परिणामी भाव वाढण्याची कुठलीही शक्यता वाटत नाही. त्यातही मध्यंतरी भाव वाढल्यामुळे शेतकरी कच्चा कांदा विक्रीला आणत आहेत. तसेच लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमावर निर्बंध आहेत. हॉटेलमध्ये गर्दी कमी झाली असल्याने कांद्याला मागणी नाही.

Advertisement

वर्षभरापूर्वी कांद्याने किलोला शंभरी पार केली होती. परिणामी शेतकऱ्यांनी चढ्या भावाने बियाणे व कांदा रोप विकत घेऊन लागवड केली. कांदा लागवड क्षेत्र वाढले. त्यातच चाळीस ते पन्नास रुपये किलोवर असणारे भाव पंचवीस ते तीस रुपयांवर आल्यावर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यांनी जास्त प्रमाणात कच्चा कांदा आणल्याने भाव आणखी घसरले आहेत.

Advertisement

व्यापारी सांगतात की, डिसेंबर ते जानेवारी महिन्यात असणारे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कारण कोरोनाचे वाढत असणारे प्रमाण व लॉकडाऊन होणार असल्याची अफवा कारणीभूत आहे. पुढील कालावधीतही लाल कांद्याला विशेष भाववाढ मिळेल असे चिन्ह नसल्याचे पुण्यातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply