Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोबीची व्यथा : कष्टाने पिकवला अन जनावरांना खायला घातला, पहा कुठे घडली ‘ही’ परंपरागत किमया..!

अहमदनगर :

Advertisement

शेती म्हणजे कष्ट आणि जिद्दीचा व्यवसाय. मात्र, या व्यवसायाला अजूनही राजमान्यता मिळाली नाही. परिणामी हा व्यवसाय समाजमान्यताही गमावून बसला आहे. त्याला कारण ठरले आहे शेतमालास परवडणारा भाव न मिळणे. असाच प्रकार राहुरी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या वाटेला आला आहे.

Advertisement

वाहतूक खर्च १५०० रुपये, पॅकिंग बॅग ३०० रुपये तसेच कोबी तोडणी व भरण्याची मजुरी ५०० रुपये असा २३०० रुपये खर्च करून शेतकऱ्याने नगर येथे मार्केटला हा शेतमाल आणला. मात्र, अखेरीस कोबीला ग्राहक नसल्याने जनावरांना चारा म्हणून ७० पैसे किलो या दराने विकण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली. शेतीमधील हेच वास्तव आणि हीच या व्यवसायाची आता परंपरा बनली आहे.

Advertisement

हा अभागी अनुभव आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे  संजय तोडमल (रा. मोकळओहोळ, ता. राहुरी). ७० पैसे किलो बाजारभावात कोबीची विक्री झाल्याने वाहतुकीसाठी ६०० रुपये पदरमोड करण्याची दुर्दैवी वेळ या शेतकऱ्यावर आली आहे.

Advertisement

तोडमल यांनी ७० पैसे दराने कोबी रोपे आणून एका एकरात डिसेंबर महिन्यात कोबीची लागवड केली होती. रोपासाठी २० हजार रुपये, तर ८ हजार रुपयाची खते, कोबी पिकावर कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधाची फवारणी, मशागत असा किमान ४० हजारांचा खर्च त्यांनी केला होता. मात्र, आता त्यातून खर्चाची रक्कमही त्यांच्या हाती आलेली नाही.

Advertisement

कोबीला बाजारभाव नसल्याने आठवडेभरापासून या तयार पिकाची विक्री त्यांनी थांबवली होती. मात्र, जास्त कालावधीत कोबी खराब होण्याची भीती असल्याने दोन दिवसांपूर्वी या शेतकऱ्याने अडीच टन कोबी थेट नगर येथे विक्रीसाठी आणल्यावर जनावरांना चारा म्हणून विकून वरती ६०० रुपयांची पदरमोड करावी लागली आहे. 

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply