Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंचा ‘ना’ नारा बदलला; युटर्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले ‘ते’ महत्वाचे आवाहन

मुंबई :

Advertisement

मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणजे राजकारणातील एक अजब व्यक्ती. कधी कोणत्या भूमिकेवर अवघा महाराष्ट्र पेतावातील आणि कोणत्या भूमिकेवर आपली भूमिका बदलतील याचा काहीही नेम नाही. सध्या मास्क न घालून फिरत असलेल्या राज ठाकरे यांनी आता ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’च्या मुद्द्यावर युटर्न घेतला आहे.

Advertisement

वर्षभरापूर्वीच प्रकल्पाविरोधातील स्थानिक जनतेने राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी हा प्रकल्प अजिबात नकोच असे म्हटले होते. स्थानिकांच्या भावनांची काळजी घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची त्यांची भूमिका होती. आता मात्र त्यात तब्बल १८० अंशाच्या कोनात बदल करून त्यांनी आता त्यास पाठींबा दर्शवला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारे नाही. एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राच्या बाहेर जाणे आपल्याला परवडणारा नाही. अन्यथा ‘औद्योगिकीकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही.

Advertisement

हे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, निसर्गाची हानी न होता उद्योग आणि प्रकल्प उभे करून स्थानिक तरुणांची प्रगती कशी होईल, याचा विचार करून सरकारने धोरण ठरवायला हवे हे मी आपल्याला सुचवू इच्छितो. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतिपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply