Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ वाढणार कार प्राईस; पहा नेमका काय फायदा-तोटा होणार सामान्यांना

मुंबई :

Advertisement

सुप्रीम कोर्टाच्या समितीच्या सूचनेनंतर अखेर रस्ते परिवहन मंत्रालयाच्या लक्षात आलेले आहे की, अपघातामध्ये प्रवाशांना वाचवण्यासाठी एअरबॅग सक्ती आवश्यक आहे. त्यानुसार आता ही सक्ती लागू झाल्यावर कारच्या किमती वाढणार आहेत.

Advertisement

१ जुलै २०१९ पासून कारच्या ड्रायव्हर सीटसाठी एअरबॅग सक्तीची झाली. सरकारने आता चालकाच्या बाजूच्या सीटसाठीही एअरबॅग सक्ती केली आहे. मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, १ एप्रिल २०२१ व यानंतर तयार होणाऱ्या सर्व मॉडेल्सच्या नव्या कारमध्ये २ एअरबॅग अनिवार्य असतील. 

Advertisement

एअरबॅग अनिवार्य करण्याच्या निमित्ताने आपण पाहूयात काही महत्वाचे मुद्दे :

Advertisement

जगभरातील फ़क़्त १ % वाहने भारतात अाहेत. मात्र, अपघाती मृत्यूंमध्ये भारताचा वाटा तब्बल १३ % इतका मोठा आहे.

Advertisement

एअरबॅग नसल्यामुळे अनेकांचा अपघातात मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याचे प्रमाण भारतात जास्त आहे.

Advertisement

भारतात अजूनही ग्राहक कार किती स्टाईलीश दिसते हेच पाहतात. कराची सुरक्षितता हा खूप दुय्यम मुद्दा आहे. आता लाइट कमर्शिअल वाहनांतही एअरबॅग सक्तीची मागणी होत आहे. कारण यातील अनेक चालक रात्री गाडी चालवतात व अपघातांना बळी पडू शकतात.

Advertisement

१ एप्रिलनंतर तयार होणाऱ्या नव्या मॉडेलमध्ये २ एअरबॅग सक्तीच्या असतील. ३१ ऑगस्ट २०२१ ची मुदत सध्याच्या मॉडेलच्या कारसाठी आहे.

Loading...
Advertisement

आधीच्या कारला एअरबॅग बसवण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना गरज वाटेल त्यांनी ती बसवून घ्यावी. कारण, ही आवश्यक गरज आहे. मात्र, जुन्या गाडीत एअरबॅग बसवणे कठीण आहे. खर्चही २ ते ३ लाख रुपये येईल.

Advertisement

वाहन धडकल्याच्या सेकंदापेक्षाही कमी वेळेत एअरबॅग उघडते. यामुळे प्रवाशाचे डोके व बरगड्यांना सुरक्षा देऊन शरीर डॅशबोर्डाला धडकत नाही. मात्र, तरीही एअरबॅगसाठी सीट बेल्ट अनिवार्य असते. ते लावलेले नसेल तर एअरबॅगमुळेच इजा होते. मानेचे हाड मोडू शकते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply