Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधणार : कृषिमंत्र्यांची घोषणा

धुळे :

Advertisement

तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास हेच शासनाचे लक्ष्य असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

Advertisement

महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान 2020-21 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा शुभारंभ राज्याचे कृषिमंत्री  दादाजी भुसे यांच्या हस्ते बारीपाडा येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

Advertisement

सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगताना मंत्री श्री.भुसे म्हणाले, बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. जुन्या बियाण्यांचे जतन व संवर्धन करून चांगला उपक्रम राबविला आहे, हा उपक्रम अनुकरणीय असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी देशबंधु ॲग्रो रिसर्च कंपनीच्या आढावा बैठकीत कंपनीच्या कामकाजाचा मंत्री भुसे यांनी आढावा घेतला.

Advertisement

सर्व सदस्यांशी संवाद साधत कंपनीच्या प्रगतीचा सर्व लेखाजोखा त्यांनी जाणून घेत त्यांच्या अडचणी व समस्याही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. पिक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतांना, मत्स्यपालनासाठी स्थानिक आदिवासी शेतकरी बांधवांना प्राधान्य देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल ही संकल्पना यशस्वी ठरत आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाडीबीटीच्या अनुषंगाने आता प्रत्येक शेतकऱ्याला केवळ एक पानी अर्ज एकदाच सादर करावा लागणार असून विविध योजनेसाठी वारंवार अर्ज सादर करण्याची गरज यापुढे भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Advertisement

प्रारंभी महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान 2020-21 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा कार्यक्रम मंत्री भुसे यांच्या हस्ते पार पडला. राज्याचे कृषिमंत्री  दादाजी भुसे यांचा आज वाढदिवस असल्याचे औचित्य साधत आदिवासी महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

Loading...
Advertisement

त्यानंतर मंत्री भुसे यांनी शेतकरी सोमनाथ चौरे व मोतीराम पवार यांच्या शेतशिवाराची पाहणी केली. आदिवासी बांधवांसोबत मंत्री श्री.भुसे यांनी जेवणाचाही आस्वाद घेतला. राज्याचे कृषिमंत्री त्यांच्या वाढदिवशी थेट आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतशिवाराची पाहणी करत शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या मंत्र्याचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply