Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद लॉकडाऊनबाबतचे ‘हे’ आहे वास्तव; म्हणून रविवारी होत आहे बैठक

औरंगाबाद :

Advertisement

करोना रुग्णांच्या वाढीचा टक्का फोफावत असल्याने काही भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय झालेला आहे. शहरातही असाच निर्णय घेतला गेल्याची बातमी वेगाने पसरली आहे. मात्र, ती फ़क़्त अफवा असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या बैठकीनंतरच घेण्यात येणार आहे. त्यासाठी चव्हाण यांच्यासह मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी मंगेश गोदावले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कानन येळीकर जिल्हा शल्यचिकित्सक सूंदर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रविवारी संध्याकाळी बैठक होणार आहे.

Advertisement

चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की, सोमवापासून लगेच लॉक डाउन असा निर्णय झाला नाही.लॉक डाउन निर्णय नक्की घेण्यात येणार आहे.मात्र त्यासाठी लोकांना वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे लोकांनी लगेच गर्दी करू नये. औरंगाबादेत 10 दिवसांचा लॉकडाउन लागणार अशा अफवा सध्या सुरू आहेत.

Advertisement

माध्यमांनी आपल्या ऑनलाइन पोर्टलवरून औरंगाबादेत लॉकडाउन लागणार अशा बातम्या लावल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी घाईने खरेदी-विक्री सुरू केली आहे.

Advertisement

दरम्यान, लॉकडाउन अतिशय कडक केला जाणार आहे. योग्य ती सर्व कारवाई या काळात केली जाणार आहे. मात्र सोमवारपासून लगेच लॉकडाउन असा निर्णय घेतला नाही. याबाबत रुग्णवाढीच्या बाबत चर्चा केली जाणार असून डॉक्टराचे मत देखील विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे लोकांनी लगेच गर्दी करू नये असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply