Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक आयोगाचा मोदींना अजून एक झटका; ‘तिथूनही’ फोटो हटवण्याचे दिले आदेश

दिल्ली :

Advertisement

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सर्व पक्षीयांच्या प्रचाराला आता आणखी वेग आला आहे. 2 दिवसांपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना झटका दिला होता.

Advertisement

बुधवारी सर्व पेट्रोल पंप डीलर्स आणि इतर एजन्सींना पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) यांचे छायाचित्र असलेले केंद्रीय योजनांचे होर्डिंग्ज त्यांच्या आवारातून 72 तासात काढण्याचे निर्देश दिले होते.

Advertisement

अशातच आता निवडणूक आयोगाने मोदींना अजून एक झटका दिल्याचे समोर आले आहे. देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे.

Advertisement

या गोष्टीवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची दखल घेत केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्यास सांगितले आहे.

Advertisement

मागील प्रकरणात तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली आणि होर्डिंग्जमध्ये पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा उपयोग लोकांना केंद्रीय योजनांविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

तर आता देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, कोरोना लस घेतलेल्यांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, तेथील कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Loading...
Advertisement

केंद्र सरकार आचार संहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाकडून तो आरोप फेटाळण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply