Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात ‘इतके’ आहेत शेतकरी मंत्री आणि खासदार; पहा त्यात भाजपचे किती?

Please wait..

पुणे :

Advertisement

देशातील शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन मागील १०१ दिवसांपासून चालू आहे. तरीही केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये याप्रकरणी तोडगा निघू शकलेला नाही. देशातील सरकारमध्ये २० मंत्री आणि संसदेत सुमारे २०० खासदार शेती किंवा शेतीवर आधारित व्यवसायावर अवलंबून असतानाही यावर तोडगा निघू शकलेला नाही हे विशेष..!

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्यासह नितीन गडकरी, सदानंद गौडा, अर्जुन मुंडा, एम ई नक्वी, राजनाथ सिंग आणि महेंद्रनाथ पांडे हे केंद्रीय मंत्री ‘हाडाचे शेतकरी’ आहेत. त्यांनी आपले मुख्य उत्पन्नाचे सधन शेती असल्याचे म्हटलेले आहे.

Advertisement

तर, भाजपच्या एकूण ३०२ खासदारांपैकी तब्बल ४६ टक्के म्हणजे १३९ खासदार हे शेतकरी आहेत. एकूणच देशाच्या सत्तेत असलेल्या प्रमुख नेत्यांसह त्यांना पाठींबा देणाऱ्या खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हाडाचे शेतकरी’ आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस दिशा देण्यात सरकार कमी पडले असल्याचे आरोप होत आहेत हेही विशेष आहे.

Advertisement

माेदी सरकारमध्ये एकूण ५३ मंत्री आहेत. त्यात २१ कॅबिनेट व ३२ राज्यमंत्री आहेत. २१ कॅबिनेट मंत्र्यांपैकी ७ शेतकरी आहेत. ३२ राज्यमंत्र्यांपैकी १३ शेतकरी आहेत. अशा पद्धतीने केंद्र सरकार हे शेतकरीमय आहे. अशावेळी शेतकरी आंदोलन तब्बल शंभर दिवस पूर्ण करत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

Advertisement
Loading...

पक्षनिहाय शेतकरी खासदार असे :

Advertisement
पक्षाचे नावएकूण खासदारशेतकरी खासदार
भाजप३०२१३९
काँग्रेस५११३
शिवसेना१८११
द्रमुक२४१०
जदयु१६

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply