Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मनसुख हिरेन यांची ‘ही’ माहिती आहे का तुम्हाला; कोण होते आणि कसा घडला घटनाक्रम

मुंबई :

Advertisement

रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ज्या गाडीत स्फोटके सापडली होती त्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला भाजप आणि मनसे या दोन्ही राजकीय पक्षांनी घेरले आहे.

Advertisement

गाडीमालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे हे प्रकरण गूढ बनले आहे. त्यामुळेच याला राजकीय महत्व आलेले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या घटनास्थळी उपस्थितीमुळे याला राजकीयदृष्ट्या जास्त वजन प्राप्त झालेले आहे. दरम्यान, मनसुख हिरेन हे कोण होते आणि नेमका कसा घटनाक्रम घडला याचे सर्चिंग गुगलवर सुरू झालेले आहे. त्यामुळे वाचा ही महत्वाची माहिती.

Advertisement

अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सोडलेल्या स्कॉर्पियो कारशी संबंधित असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीतून पोलिसांना मिळाला. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनसुख हिरेन यांचा ठाण्यात कार डेकोरचा व्यवसाय आहे.

Advertisement

आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती. पोलीस जेव्हा कधी फोन करायचे, तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. कालही त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. १० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली,” असे मनसुख यांची पत्नी विमल हिरेन यांनी म्हटले आहे. मग ते तावडे कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

स्कॉर्पिओ कारबरोबरच पांढरी इनोव्हा कारही वापरण्यात आल्याचं आढळून आलं होतं. यातील स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

Advertisement

हिरेन कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ४ मार्चला रात्री आठपर्यंत मनसुख हे दुकानात बसलेले होते. सोबत मुलगादेखील होता. कांदिवलीवरुन फोन आल्यावर घोडबंदरला रस्त्यावर भेटायला बोलावल्याचे सांगून बाइकवर घरी जाण्यासाठी निघाले. दुकानातून घरी आल्यानंतर सुमारे ८.३० वाजता घरातून बाहेर पडताना त्यांनी दुचाकी सोबत नेली नव्हती. त्यानंतर मात्र त्यांचा कोणसोबतही संपर्क झाला नाही.

Advertisement

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ ही कार उभी करण्यात आली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या सुट्या कांड्या आढळल्या होत्या.

Loading...
Advertisement

‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच या प्रकरणाला शुक्रवारी (५ मार्च) नाट्यमय वळण मिळाले आहे. कारण, गाडीमालक हिरेन यांचा मृत्यू झालेला आहे. लॉकडाउनमध्ये ही कार वर्षभर एका जागी उभी होती. ती दुरुस्त करून विकण्याचा मनसुख यांचा विचार होता अशी माहिती पुढे आली आहे.

Advertisement

दि. १७ फेब्रुवारीला हिरेन ही कार घेऊन ऑपेरा हाऊसकडे जाताना स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी ही कार उड्डाणपुलाजवळ सोडली होती. परंतु, रात्री परत आले तेव्हा ही कार नसल्याने याप्रकरणी त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कारचोरीची तक्रार नोंदवली होती.

Advertisement

स्टिअरिंग फिरत नव्हते मग चोरणाऱ्या व्यक्तींनी कार पुढे कशी नेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे जप्त करण्यात आलेली सॅम पीटर न्यूटन यांची ही कार हिरेन यांनी पैसे नसल्याने जप्त केल्याची माहिती पुढे आलेली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply