Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाझे यांच्या मुद्द्यावर वाढले ठाकरे सरकारचे ओझे; पहा भाजप-मनसेचे काय म्हणणे आहे ते

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी (दि. ५ मार्च) संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हिरेन यांच्या कुटुंबियांनी आणि विरोधी पक्षांनी याप्रकरणी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

Advertisement

हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चर्चेत आले आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही सचिन वाझे यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेनेही याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाना साधला आहे.

Advertisement

शेलार यांनी म्हटले आहे की, वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असल्याचं पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी.

Advertisement

(2) Sandeep Deshpande on Twitter: “श्री सचिन वाझे ह्यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???” / Twitter

Advertisement

तर, वाझे यांनी याबाबत म्हतेल आहे की, हिरेन यांनी पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याचं म्हटलं होतं. पोलीस तुम्हाला संशयिताच्या नजरेने पाहत असल्याचं एका पत्रकाराने रात्री उशिरा फोन करून त्यांना म्हटलं होतं. तशी माहिती त्यांनी तक्रारीत दिलेली आहे. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते. त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो.

Loading...
Advertisement

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सरकारला सवाल केले आहेत. “सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply