Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऋषभच्या खेळीवर सेहवागही खुश; भोगले यांनीही व्यक्त केले ‘असे’ आश्चर्य..!

मुंबई :

Advertisement

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी करत ऋषभ पंतने टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. पंतने या सामन्यात तडाखेबंद शतक लगावले असून सिक्सर मारत त्याने आपले शतक पूर्ण केले. यावर भारताचा
विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने हटके प्रतिक्रिया दिली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या ऋषभ पंतने धडाकेबाज शतक ठोकले. हे त्याच्या कारकीर्दीचे तिसरे शतक असून पंतने अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एका षटकात दोन शानदार चौकार ठोकले. त्याने अँडरसनच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपही लावला. पंतच्या या शॉटवर व
सिक्सरवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग जाम खुष झाला आहे.


सेहवागने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, अँडरसनच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप आणि नंतर एका षटकारासह शतक … हा माझा मुलगा आहे. त्याचवेळी हर्षा भोगले यांनी लिहिले की पंतची फलंदाजी पाहून मजा येते. पंतच्या रिव्हर्स स्वीपवरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पंत अँडरसनच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप लावेल असे मला वाटत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे.


दरम्यान, पंतची अशी विस्फोटक खेळी पाहून अनेक जण आता त्याची सेहवागसोबत तुलना करत आहेत. क्रिकेट चाहत्यांनी तर पंत कसोटी सामना खेळतोय की टी २० सामना खेळतोय असा प्रश्न विचारत त्याचे कौतुक केले आहे. पंतने ११८ चेंडूत १०१ धावा केल्या असून त्याने ११५ चेंडूत शतक पूर्ण केले. या
खेळीत पंतने १३ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Loading...
Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply