Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रोहितने ‘तो’ विक्रम केला नावावर; पहा काय किमया केलीय या क्रिकेटपटूने

मुंबई :

Advertisement

भारताच्या रोहित शर्माने सलामीवीर म्हणून कामगिरी करताना एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला असून असा विक्रम करणारा रोहित हा जगातील पहिला सलामीवीर ठरला आहे. हा विक्रम त्याने इंग्लंडविरुध्द सुरु असलेल्या कसोटीत सामन्यात नोंदवला आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेचा अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात असून या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मासाठी खूप महत्वाचा होता.


रोहित शर्माने या कसोटी सामन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मध्ये १ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला असून असा विक्रम करणारा तो जगातील पहिला सलामीवीर फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत यापुर्वी सहा खेळाडूंनी १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र सलामीवीर म्हणून हा विक्रम रोहितच्या नावे नोंदविला गेला आहे. भारतबाबत बोलायचं झाल्यास असा विक्रम करणारा रोहित दुसरा भारतीय असून रोहितच्या आधी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लबुशेनने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (डब्ल्यूटीसी) सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यत १ हजार ६७५ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रूट असून त्याने या सामन्यापूर्वी १ हजार ६२५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आहे, ज्याने आतापर्यंत १ हजार ३४१ धावा केल्या आहेत.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Loading...
Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply