Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दुपारी ठरणार बँकेचे पदाधिकारी; निवडीद्वारे ठरणार अनेक मतदारसंघाची दिशा..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीची निवडणूक गाजली होती. आता त्याच 21 संचालाकांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जाणार आहे. आज दुपारी होत असलेल्या या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संचालक मंडळावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीमध्ये महाविकास आघाडीतर्फे अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी बारामतीचा आदेश हा निर्णायक घटक ठरणार आहे. परिणामी याची सर्व खलबते मुंबई आणि नगरच्या शासकीय विश्रामगृहातून होतील.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मुंबईतून सूचना आणि मार्गदर्शन आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनातील व्यक्तीला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांनी या तीन नेत्यांच्या मनात घर करण्याचे मनसुबे आखलेले आहेत.

Advertisement

या पदाच्या निवडीमुळे दोघांना बळ मिळणार आहे. हे दोघेजण कोण, हे आज दुपारी स्पष्ट होईल. ज्यांना संधी मिळेल त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी आणखी ताकद मिळेल. किंवा यामुळे एखाद्याची ताकदही कमी होऊ शकेल. निवडीनंतर याचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Advertisement

अर्ज घेणे, भरणे, जमा करणे, छाननी, वैध अर्जांमधून निवडणूक घेऊन पदाधिकारी निवडणे ही प्रक्रिया आज दुपारी पूर्ण होणार आहे. दुपारी २.४० वाजेपर्यंत अध्यक्ष, तर त्यानंतर सुरू होणारी उपाध्यक्ष निवड ४.२५ वाजेपर्यंत चालणार आहे. जर, निवड बिनविरोध होणार असेल तर मग अगोदरच निवडी जाहीर होतील.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply