Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून झाली सरावासराव सुरू; पहा नेमके काय म्हटलेय सभापती दातेंनी

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि मुख्य सदस्य यांच्यात विसंवाद असल्याची चर्चा सुरू आहे. स्थायी समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहून सभापती आणि सदस्य यांनी अध्यक्षांच्या निधी वाटपावरील नाराजी स्पष्ट केली केली होती. मात्र, आता त्यांनीच सरावासराव सुरू केली आहे.

Advertisement

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांच्यात विकासकामे व निधीवाटपावरून मतभेद निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. प्रशासकीय सूत्र आणि राजकीय गोटातील मंडळींनी अनेकदा खासगीत पत्रकारांना याबाबत सांगितले आहे. त्याचीच झलक स्थायी समितीच्या बैठकीत दिसली.

Advertisement

जिल्हा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित असूनही अनेकांनी बैठकीला अनुपस्थित राहून आपली नाराजी उघड केली होती. त्यावर बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी गुरूवारी भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement

‘आमच्यात कुठेच काही बिघडलेले नाही. आमच्यात समन्वय आहे’, असेच सभापती दाते यांनी म्हटले आहे. ‘पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, असा जावईशोध कोणी लावला’ असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Advertisement

 बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेवर विषय समितीच्या चारही सभापतींनी बहिष्कार घातला होता. त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती. अखेरीस पुन्हा एकदा त्यावर पडदा पडणार असेच दाते यांनी सूचित केले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply