Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तर ‘त्या’ बोअरवेल चालक-मालकांवर होणार कारवाई; पहा नेमका काय झालाय निर्णय

नाशिक :

Advertisement

दाढी-कटिंग आणि मोबाईलचे भाव जसे संघटनांनी एकसमान करण्याचे धोरण ठेवले आहे. तसाच प्रकार आता बोअरवेलबाबतही सुरू झालेला आहे. याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. ‘सियेसंको’ बोअरवेल असोसिएशन यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.

Advertisement

सिन्नर, येवला, कोपरगाव, संगमनेर या भागातील ३५ बोअरवेलमालकांनी याप्रकरणी संप पुकारला होता. त्याला निमित्त झाले होते केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचे. त्यावर असोसिएशनने ठरवले आहे की, दरपत्रकापेक्षा कमी दरात काम करणाऱ्या मालक, एजंटांना ५० हजार रुपये दंड करण्याबरोबरच बोअरवेलची गाडी १० दिवस जप्त करण्यात येतील.

Advertisement

बोअरवेलच्या दरातही प्रतिफुट १० ते १५ रुपयांची वाढ करण्यासह जमिनीच्या प्रकारानुसार ८० ते ९५ रुपयांपर्यंत प्रति फूट दर आकारणी करण्याचे सियेसंको’ बोअरवेल असोसिएशन यांनी ठरवले आहे. तसेच केसिंग पाइपचा चार आणि सहा किलोचा दरही बदलण्यात आलेला आहे.

Advertisement

असोशिएशनचे अध्यक्ष भास्कर धारणकर, जयंत धारणकर, संजय थोरात, तात्यासाहेब दिघे, संतोष गायकवाड आदींसह पदाधिकारी, मालक, चालक यांनी याबाबतचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्यानुसार आता सलूनमध्ये किंवा मोबाईल दुकानातून ठरलेल्या किमतीपेक्षा कमी भावाने सेवा किंवा व्रिक्री झाल्यास जसा दंड केला जातो. तसेच बोअरवेलबाबतही होणार आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply