Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ठेकेदाराच्या चुकीचा ड्रायव्हर्सना फटका; पहा नेमका काय घोळ झालाय लायसन्सचा

सोलापूर :

Advertisement

सामान्य माणसाची एक साधी किरकोळ चूक झाली की त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागणाऱ्या सरकारी यंत्रणेचा सावळागोंधळ जगजाहीर आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळून घेण्यामध्ये कोणतीही यंत्रणा मागे नाही. असाच प्रकार उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ यांच्याबाबत घडला आहे.

Advertisement

ठेकेदार कंपनीकडे कोरे कार्ड उपलब्ध नसल्याने वाहन परवान्याचे नूतनीकरण थांबल्याची गंभीर घटना सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घडली आहे. नवीन लायसन्स भेटत नसल्याने पोलिसांनी अडवल्यावर दाखवायला परवाना नसल्याने अशा ड्रायव्हर्सना दंड भरावा लागत आहे. तर, ठेकेदार कंपनीबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.

Advertisement

दिव्य मराठी या वृत्तपत्राने ही महत्वाची बातमी उघडकीस आणली आहे. ७ जानेवारीपर्यंत वाहनपरवाना करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या कंपनीकडे फक्त १ हजार काेऱ्या वाहन परवानाच्या प्रती उरल्या अाहेत. यामुळे हजारो वाहनधारकांना नव्या वाहनपरवान्यापासून वंचित राहावे लागत आहे. ज्या मक्तेदारांना वाहन परवाना करण्याचे काम दिले आहे त्यांच्याकडे सध्या वाहन परवान्याच्या कोऱ्या प्रती उपलब्ध होत नाहीत. त्यांनी याची मागणीही कंपनीकडे केली. कंपनीकडून येत्या सोमवारपर्यंत पुणे विभागाला १५ हजार कोरे वाहन परवाने येण्याची शक्यता अाहे, असे बातमीत म्हटले आहे.

Advertisement

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी म्हटलेले आहे की, परवाना तयार करून देण्यासाठी एका कंपनीला मक्ता देण्यात आला आहे. त्यांच्याकडे पुरेसे काेरे वाहन परवाने उपलब्ध नसल्याने वाहन चालकांना वाहन परवाना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. वाहन चालकांनी आपले वाहन परवाने नूतनीकरण करण्यासाठी दिलेले आहेत. त्यांनी डिझी लाॅकचा वापर करावा.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply