Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ST व शासकीय डेअरीबाबत दरेकर यांनी मांडला ‘तो’ मुद्दा; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे करण्यासह दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ठोस निर्णय घेण्याची मागणी विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली आहे.

Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विषय देखील त्यांनी या चर्चेत उपस्थित केला. एसटी कर्मचारी दिवस-रात्र राबत असताना ३ – ३ महिने त्यांना पगार मिळत नाही, भाजपाच्या आग्रही भूमिकेमुळे त्यांना २ महिन्यांचा पगार मिळाला, हाही प्रश्न सरकारने हाताळला पाहिजे तसेच एसटी महामंडळाच्या भविष्यासाठी दीर्घकालीन आराखडा बनवण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली. 

Advertisement

दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो, बंद पडणाऱ्या शासकीय डेअऱ्या वाचवा, यासाठी देखील एक आराखडा तयार करा, निधी द्या, अशीही मागणी दरेकर यांनी या चर्चेत सरकारला केली.

Advertisement

कोरोनामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली असताना निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.  मुंबई महानगरपालिका क्षेत्रात खादी ग्रामोद्योगची २५ एकर जागा गणेश नायडू हा व्यक्ती अनधिकृतपणे वापरत आहे, या जागेवर गरबा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांमधून ३- ४ कोटी रुपये कमावतो आहे, त्यामुळे नायडू सारख्यांना पाठीशी न घालता, ही जागा सरकारने ताब्यात घ्यावी, त्यामधून सरकारला मोठा निधी मिळू शकेल, अशी सूचनाही दरेकर यांनी सरकारला केली.

Advertisement

ठाणे आणि मुंबईमधील वन जमिनींवर लाखोंच्या संख्येने झोपडपट्टी उभारली गेली आहे. केतकीनगर, दामूनगर, अशा अनेक विभागात वीज नाही, पाणी नाही, शौचालये नाहीत. परंतु, कोर्टाचे निदेश पुढे करुन या गरिबांना नागरी सुविधा दिल्या जात नाहीत.  वन जमिनींच्‍या बॉर्डरवरील एस.आर.अे.स्किमला वाढीव एफएसआय देऊन वनजमिनींवरील या गरीब रहिवाशांना सदनिका दिल्यास हा विषय कायमचा सुटु शकतो, यासाठी गृह मंत्री यांनी एस.आर.अे., वन विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी  चर्चेत केली.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply