Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोकणसाठी दरेकरांनी केली ‘ती’ महत्वाची मागणी; ‘महाविकास’वर केली गंभीर टीका

मुंबई :

Advertisement

वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची निर्मिती करा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. ते सन २०२०- २१ च्या पुरवणी मागण्यांवर आज विधान परिषदेत बोलत होते.

Advertisement

राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी असलेल्या वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींनी मांडलेली आहे.  राज्यातील मागास भागांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यघटनेत वैधानिक विकास मंडळाची तरतूद करण्यात आली, परंतु, वर्षभर या मंडळांना मुदतवाढ दिली गेली नाही, या भागांसाठीचा निधी अन्य भागांकडे वळविला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.  परंतु, गेले वर्षभर महाविकास आघाडी सरकार याबाबतीत निर्णय घेण्यास तयार नाही.  हा निर्णय तर सरकारने घ्यावाच पण त्याबरोबरच वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या कोकणासाठी सुध्दा स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे, अशी आग्रही मागणी दरेकर यांनी केली.

Advertisement

अनेकवेळा कोकणाच्या तोंडाला पाने पुसली जातात, मच्छीमारांचा प्रश्न आहे, पर्यटनाचा विषय आहे,  परंतु, कधीच कोकणासाठी अधिकच्या निधीची तरतूद केली जात नाही. कोकण विकासासाठी एक इंटिग्रेटेड डेव्‍लपमेंट आराखडा तयार  करण्याची आवश्यकता आहे.   शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्याचं काम सातत्याने कोकणाने केलं आहे, पण गेल्या वर्षभराच्या कालावधीत कोकणासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचं दिसून आलं नाही, कोकणातील अनेक प्रकल्प अपुरे असल्यामुळे येत्या अर्थसंकल्पात कोकणासाठी भरीव तरतूद करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

Advertisement

महाराष्ट्राचे सुपूत्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळं उभं राहीलं आहे.   कोकण- मुंबई- गोवा महामार्ग व कोकणातील अनेक महामार्गाचे काम सुरु झाले आहे.  या रस्त्यांच्या कामांना त्यांच्या मदतीने राज्यसरकारने गती द्यावी. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पर्यटनासाठी दोनशे-अडीचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असला तरी निधीअभावी हा आराखडा कागदावरच राहिला आहे, त्यामुळे कोकणवासियांना केवळ गोंडस स्वप्नं दाखवण्याचं काम होत आहे.  पर्यटनाच्यादृष्टीने पूर्ण कोकण विकसित होऊ शकतं, अगदी पालघरसारख्या आदिवासी पट्ट्यातही अनेक प्रकल्प उभे राहू शकतात, अनेक मंदिरं, गडकिल्ले, समुद्र किनारपट्टी आपल्या महाराष्ट्रात विशेषत: कोकणात आहे, यासाठी किमान ५ हजार कोटींचा इंटिग्रेटेड आराखडा तयार करावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply