Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उद्या समजणार महाराष्ट्राच्या आर्थिक ‘आरोग्या’चे वास्तव; ‘त्या’ वेबसाईटवरही माहिती असणार सर्वांसाठी खुली

मुंबई :

Advertisement

राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दि. 5 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार हे विधीमंडळात सादर करणार आहेत. विधीमंडळात अहवाल सादर झाल्यानंतर पत्रकार व अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in तसेच https://mls.org.inhttps://www.maharashtra-gov.inhttps://www.finance.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिली आहे.

Advertisement

 दरवर्षी राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक दिवस अगोदर ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ हे प्रकाशन विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाते. दि.1 मार्च, 2021 पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21 हे प्रकाशन दोन्ही सभागृहांमध्ये दि.5 मार्च, 2021 रोजी सादर केले जाणार आहे.

Advertisement

यंदाच्या वर्षी सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार विधीमंडळात वित्तमंत्र्यांनी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21’ सादर केल्यानंतर पत्रकार तसेच अभ्यासकांसाठी हा अहवाल डिजीटल स्वरुपात वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply